जळगावा जिल्हामहाराष्ट्र

हिवरखेड येथे भोपळे विद्यालयात स्वातंत्र्यदिन संपन्न! विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यी, खेळाडूंना केले बक्षीस व प्रमाणपत्र वितरण!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी विजय घोडे

हिवरखेड ; हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद भोपळे, सुनील राऊत, कार्यवाह श्यामशिल भोपळे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, जेष्ठ संचालक प्रकाश खोब्रागडे, वीरेंद्र भोपळे, शिवशंकर मार्के, संचालिका साधना भोपळे, नीलिमा भोपळे, संस्थेचे हितचिंतक धैर्यशिल भोपळे, गजानन बंड, देविदास देशमुख, केशव कोरडे, संस्था संचालक प्रा.कौस्तुभ भोपळे, नयन अग्रवाल, गणेश राठोड, सत्यदेव तायडे आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक व पत्रकार मंडळी उपस्थित होती. या दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या आजीवन सदस्या स्व. कमलिनी सहदेवराव भोपळे यांच्या जयंती उत्सवानिमित्त विद्यालयातील बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यां, खेळाडू यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी तथा गावातील तरुणांच्या यशाबद्दल त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यात बँक भरतीत निवड झाल्याबद्दल कपिल विजय खिरोडकार, प्राध्यापक पात्रता परीक्षेतील उत्तीर्ण विशाल संजय गिऱ्हे, महाराष्ट्र पोलीस पदासाठी निवड पात्र प्रणय अनिल इंगळे व अजय सुधाकर गावंडे यांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा व्यक्त करीत विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची महती सांगितली. समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोषकुमार राऊत यांनी केले. तर विविध कार्यक्रमाचे संचलन पर्यवेक्षक गणेश कानझोडे, डॉ.मयूर लहाने, रंजित राठोड, प्रशांत भोपळे व पद्मा टाले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button