Uncategorized
मालेगाव जि. वाशीम येथे वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोक यांच्यातील समन्वयासाठी हे कार्यालय एक मजबूत माध्यम असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी वाशीम जिल्हा प्रभारी अरुंधतीताई शिरसाठ, नेते प्रशांत गोळे पाटील, रिसोड मालेगाव निरीक्षक पारीतोष इंगोले, तालुका तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार आदी उपस्थित होते.



