Uncategorized

ई पिक पाहणीची अट रदद करुन सरसकट कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य़ देण्यात यावे – आ.ॲड आकाश फुंडकर

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

खामगांव – राज्य़ शासनाने शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०२४/प्र.क्र. ४५ / ४ ओ दिनांक: २९ जुलै, २०२४ नुसार सन 2023 च्या खरीप हंगामामधील ई पिक पाहणी ॲप / पोर्टलव्दारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे अश्या नोदणीकृत शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये जास्तीत जास्त़ दोन हेक्ट़रच्या मर्यादित अर्थसहाय्याकरीता पात्र राहतील अशी घोषणा केली. त्यानुसार ई पिक पाहणीचे पंचनामे देखील सुरु झालेले आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांचे ई.पिक पाहणी केली असूनही त्यांची नावे यादीत नसल्यामुळे ते वंचीत राहणार आहेत. त्याकरीता शासनाने ई पिक पाहणीची अट रदद करुन सरसकट कापूस व सोयाबीन उत्पादक शेततकऱ्यांना अर्थसहाय्य़ देण्यात यावे अशी मागणी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे.

        शासनाव्दारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्याची घोषणा करण्यात आली त्यानुसार कृषी विभागाने गावोगावी याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.  ई-पीक पाहणी अॅप/पोर्टल वर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील व सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल अशी घोषणा करुन यादया देखील प्रसिध्द़ करण्यात आल्या परंतु यामध्ये बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांनी ई पिक पाहणी केली परंतु त्यांचे यादीमध्ये नाव नाही. तसेच जे शेतकरी (ॲप बंद असणे) अशा काही तांत्रिक अडचणीमुळे ईपीक पाहणी करू शकले नाही तर ते शेतकरी या अर्थसहाय्यापासून वंचित राहू शकतात.  याबाबतची मागणी मा.ना.श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री, व मा.ना.श्री धनंजयजी मुंडे कृषी मंत्री यांना पत्राव्दारे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केली आहे.

         सन २०२३ च्या खरीप हंगामामधील सरसकट कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यात यावे, कोणताही शेतकरी सदर लाभापासून पासून वंचित राहणार नाही यासाठी ई पिक पाहणीची अट रदद़ करण्यात यावी अशी मागणी पत्राव्दारे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button