जळगावा जिल्हापत्रकारमहाराष्ट्रमुबई

आज ‘पत्रकार संवाद यात्रा’ जळगाव जिल्ह्यात!

जळगाव,(प्रतिनिधी) :- लोकशाहीचा बळकटीसाठी, पत्रकारांच्या हक्कासाठी नागपूर दीक्षाभूमी  ते मंत्रालय काढण्यात आलेल्या पत्रकार संवाद रॅलीचे आज दिनांक 31 जुलै रोजी जळगाव जिल्ह्यात आगमन होणार असून यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे जिल्ह्यातील पत्रकारांशी पत्रकारांचे प्रश्न, मागण्या या विषयावर संवाद साधणार आहेत.यावेळी त्यांच्या समवेत राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, राज्य समन्वयक संतोष मानूरकर, मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे यांची उपस्थिती राहणार आहे.

आज दुपारी ठीक 12 वाजता मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात दर्शन, व पत्रकारांशी संवाद, मान्यवरांच्या भेटी त्यानंतर 1 वाजता जळगाव कडे रवाना. दुपारी 2 वाजता आकाशवाणी चौकात यात्रेचे भव्य स्वागत, 2:15 मिनिटांनी महाराणा प्रताप पुतळा माल्यार्पण,अभिवादन, 2:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा(जी एस. ग्राउंड) येथे माल्यार्पण, अभिवादन, 2:45 वाजता स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा माल्यार्पण, अभिवादन. त्यानंतर सिल्वर पॅलेस येथे 4 वाजता पत्रकार परिषद व जेष्ठ पत्रकार यांच्याशी संवाद व (जळगाव मुक्काम) असेल.

दीक्षाभूमीवरून निघालेली पत्रकार संवाद रॅली सेवाग्राम (वर्धा), अमरावती,अकोला, शेगाव मार्गे दिनांक 31 रोजी जळगावात येत आहे.यात्रेदरम्यान विविध सामाजिक संघटनाचा पाठिंब्याचे पत्र देखील स्वीकारण्यात येणारं आहेत.दीक्षाभूमी येथून निघालेली पत्रकार संवाद रॅली राज्यातील विविध जिल्ह्यातून जात आहे. यावेळी पत्रकार रोज आमचे प्रश्न मांडतात. मग ते आज अडचणीत असतील तर आम्हीही त्यांच्या सोबत आहोत, असे म्हणत विविध सामाजिक संघटना, प्रतिष्ठाने संवाद रॅलीला पाठिंब्याचे पत्र देत आहेत.तरी पत्र संवाद यात्रेत जळगाव जिल्हायतील पत्रकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे अध्यक्ष सचिन गोसावी, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,पत्रकार हल्ला विरोधी समिती जिल्हाध्यक्ष भगवान मराठे,ग्रामीण जिल्हाध्यक्ष नगराज पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले, डिजिटल मीडिया अध्यक्ष प्रमोद रुले, महानगर अध्यक्ष योगेश चौधरी, खान्देश विभाग उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, ग्रामीण कार्यध्यक्ष योगेश सैतवाल, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार,प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button