बुलढाणामहाराष्ट्र
प्रतापराव जाधव यांच्याकडून कराळे कुटुंबीयांचे सांत्वन

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शनिवारी शेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नागझरी येथे भेट देऊन क्रिष्णा कराळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
आरोपीविरुद्ध कडक कारवाई करून संपूर्ण प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावावा, असे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले. यावेळी आमदार संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.



