खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

गाळेधारकांमध्ये तीव्र असंतोष : आ.पाटलांना दिले निवेदन

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी

प्रमोद सौंदडे

| ३० जुलै २०२४दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्रात म्हटल्याप्रमाणे राज्य शासनाने महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळांचे भाडे व ठेव निर्धारणासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीत गाळेधारकांचा प्रतिनिधी न घेतल्यामुळे गाळेधारकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे. तसेच दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्रात गाळेधारकांच्या हिताचे अपेक्षित बदल करण्यात यावे, यासाठी जळगाव महानगर गाळेधारक संघटनेतर्फे पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे आज दि.२९ जुलै रोजी भेट घेण्यात आली व निवेदन देण्यात आले.गाळेधारकांच्या हिताचे निर्णय घेण्यासंबंधी लवकरच मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन योग्य ते बदल करण्याची विनंती करतो, असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी डॉ.शांतारामदादा सोनवणे, राजस कोतवाल, माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, तेजस देपुरा उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button