Uncategorized

वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांची वाशिम येथे नियुक्ती

वाशिम जिल्हा प्रतिनिधि
अजय गायकवाड

वाशिम : – पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतांना वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांची राज्यशासनाने अखेर वाशिम येथे नियुक्ती केली आहे. पुणे येथे असतांना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरुवात केली होती. याबाबत वरिष्ठांनी सचिवालायाकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या तक्रारीची दखल घेत पुजा खेडकर यांची वाशिम येथे अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुजा खेडकर हया २०२३ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती पुणे येथे परिविक्षाधिन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पुण्यात त्या वादग्रस्त ठरल्याने ८ जुलै रोजी त्यांची एका आदेशान्वये वाशिम येथे परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी वाशिम येथे परिविक्षाधिन अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी कामात आपली जिल्हयात वेगळी छाप पाडली होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button