संग्रामपूर तालुक्यात घडली विचित्र घटना. युवतीने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

संग्रामपूर तालुक्यात घडली विचित्र घटना. युवतीने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी निलेश मेहेंगे) तालुक्यातील एका 24 वर्षीय युवतीने गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना 18 मे ते 28 मे दरम्यान घडली याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात 30 मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना 24 वर्षीय युवती तिच्या घरात गेली घराचा दरवाजा बंद करून पिडित मुलीला कपडे काढायला सांगितले मात्र अल्पवयीन मुलीने कपडे काढण्यास नकार दिला त्यावेळी आरोपी युवतीने जिवे मारण्याची धमकी दिली पिडितेला अर्धनग्र केले तसेच भ्रमणध्वनीमध्ये पीडितेचे फोटो काढले त्यानंतर आरोपी युवतीने अल्पवयीन मुलीसोबत नको ते चाळे करायला सुरुवात केली पिडितेने आरडाओर्डी करताच आरोपी युवतीने घरातून पळ काढला. आरोपी युवती इथेच थांबली नाही तिने इंस्टाग्राम या समाज माध्यमावर बनावट नावाने अकाऊंट तयार करून अल्पवयीन मुलीचे फोटो अपलोड केले युवतीने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्याशी पुरूषी लगट करत विनयभंग केल्याची घटना संग्रामपूर तालुक्यात उघडकीस आली दरम्यान अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात आरोपी 24 वर्षीय युवतीवर कलम452, 354, 354, (अ),354(ब),342,506, भादंविसह आर डब्ल्यू 8,12,14, पोक्सो, आर डब्ल्यू 67 माहिती तंत्रज्ञान कायधांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्या आदेशाने जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांच्याकडे देण्यात आले




