भरधाव आयशर च्या धडकेत जिल्हा परिषद शाळेवरील लिपिकाचा जागेवर मृत्यू!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)
जळगाव जामोद: नांदुरा कडून खामगाव च्या दिशेने जात असलेल्या भरधाव आयशरच्या धडके जिल्हा परिषद शाळेतील लिपिकाच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना काल 29 मे रोजी दुपारी जळगाव ते नांदुऱ्याच्या बायपास येथे घडली.
प्रदीप दत्तात्रय कुलकर्णी(52 वर्ष) असे मृतकाचे नाव असून ते सुटाळा खुर्द, खामगाव भागातील रहिवासी होते.
कुलकर्णी हे पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेवर लिपिक म्हणून कार्यरत होते. 29 मे रोजी शाळेत आपल्या कर्तव्यावर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. दरम्यान, दुपारी 12 वाजेच्या सुमारास जळगाव ते नांदुरा बायपासवरील पेट्रोल पंपा नजीक भरधाव वेगाने येत असलेल्या आयशरच्या ट्रकने त्यांना जबर धडक दिली. त्यात प्रदीप कुलकर्णी यांचे जागीच मृत्यू झाले. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार विलास पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आयशर चालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ✍


