Uncategorized
पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न.

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगाव । येथील शहर पोलीस
स्टेशनमध्ये एका गुन्ह्यात अटक
करण्यात आलेला आरोपी मो. दानिश
शे. अकील (२५) रा. रोहिणखेड
ता. मोताळा याने २७ मे रोजी
पहाटेच्या सुमारास पोलीस कोठडीत
ब्लँकेटचा काट फाडून त्यापासून दोरी
बनवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न
केल्याची खळबळजनक घटना
उघडकीस आली आहे.
मात्र वेळीच हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सदर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न का केला असावा ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.



