Uncategorized

धक्कादायक! सूर्य देवाने कहर केला….! उष्णता आणि शेतमजुराचा मृत्यू;

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)

जळगाव जामोद: नव्हता पुढे तापमान नवीन विक्रम करीत असताना एका शेतमजुराचा मृत्यू झाला. रिंगणवाडी येथे मंगळवारी ही दुर्दैवी व खळबळ जनक घटना घडली. याप्रकरणी पोलीस अकस्मित मृत्यूची आणि मृतक उष्णघाताने आणि दगावल्याची नोंद आहे.
या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा सह प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे. सचिन वामन पेठारे असे उष्णघाताने मृत पावलेल्या ४० वर्षीय मजुराचे नाव आहे. ( मृतकाची मूळ गाव तेल्हारा( जिल्हा अकोला) येथील जिजामाता नगर मधील रहिवासी आहे. रिंगणवाडी परिसरात आज मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी
दाखल झाले. मृतकाची नातेवाईक चुलत भाऊ अजय संपत पेटारे( 31 वर्ष, राहणार जिजामाता नगर तेल्हारा, जिल्हा अकोला) त्यांची त्यांनी ओळख पटविली. त्यानेच पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच फिर्यादीनुसार सचिन वामनराव पेठारे हा मंगळवारी पायीच गावाकडे जात होता. पोलीस हवालदार हवालदार गजानन गवांदे यांनी फिर्याद दाखल करून घेतली असून खामगाव ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हवालदार प्रमोद मुळे करीत आहे. प्रकरणी आकस्मित मृत्यू 174 जा. फो. अंतर्गत घटनेची नोंद करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button