श्री खाटू श्याम बाबा पालखी यात्रेचे गजानन महाराज संस्थानकडून स्वागत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव, दिनांक. २५ : श्री खाटू श्याम बाबा राजस्थान ते कन्याकुमारी पालखी यात्रेचे संतनगरी शेगाव येथे (दिनांक.२५) आगमन झाले असता श्री गजानन महाराज संस्थान तर्फे पालखी यात्रेचे स्वागत व पूजन तसेच यथोचित सन्मान करण्यात आला.
श्री क्षेत्र खाटू श्याम बाबा राजस्थान ते कन्याकुमारी अशी २५ हजार किलोमीटरची यात्रा दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. अगोदर १७ राज्यांमध्ये सदर यात्रा झालो असून आता दुसरा टप्प्यामध्ये ८ राज्यांमधून ज्यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, उडीसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू ते रामेश्वर आणि तिथून कन्याकुमारी पर्यंत सदर यात्रा पूर्ण होणार आहे. ही यात्रा दिनांक २५-५-२०२४ दुपारी श्री क्षेत्र शेगाव येथे दुपारी पोहोचलो. सदर यात्रा प्रथम स्थानिक धनुका कंपाऊंडमध्ये निलेश अग्रवाल यांच्या घरी आली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आतशबाजी करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळ
शेगाव। श्री खाटू श्याम बाबा यांची पालखी.
शेकडो श्याम बाबा प्रेमो व महिला भक्तगण त्या ठिकाणी उपस्थित होते. सदर यात्रेचे स्वागत झाल्यानंतर त्या ठिकाणी खाटू श्याम बाबांची आरती व पूजन करण्यात आले. यावेळेस भक्तांना खाटू श्याम बाबाच्या प्रसादाची वितरण ही करण्यात आले. यानंतर सदर यात्रा शेगाव शहरातील मुख्य मार्गावरून स्थानिक भैरव चौक, खेतान चौक, लहुजी उस्ताद चौक या
ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात येऊन सदर यात्रा गजानन महाराज संस्थान मध्ये पोहोचली असता त्या ठिकाणी यथायोग्य पद्धतीने यात्रेचे स्वागत व पूजन करून श्री कुमार गिरीराज शरणदास महाराज यांचे स्वागत संस्थान कडून करण्यात आले. त्यानंतर गजानन महाराजांचे दर्शन घेऊन सदर पालखी पुढील यात्रेकरता मार्गस्थ झालो


