Uncategorized

ऑनलाईन विषय विभागनीय वेबिनार मालिकेचे आयोजनप्राध्यापक व विदयार्थ्याना झाला लाभ,

जळगाव — येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये दि १४ मे ते १८ दरम्यान विषय विभागनिय ऑनलाईन वेबिनार मालीकेचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेतील मार्गदर्शनामूळे प्राध्यापक व विदयार्थ्याच्या ज्ञानात भर पडून लाभ झाला.
विविध विषयाच्या विभागातर्फे आयोजित या मालिकेत दि १४ रोजी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे आरोग्यासाठी समुदायांचे सक्षमीकरण, वृद्धत्व: समुदाय सेटिंगमध्ये जेरोन्टोलॉजिकल नर्सिंग या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एलिझाबेथ रॉड्रीक्स प्राचार्य कॉलेज ऑफ नर्सिंग मुबंई, दि १५ मे रोजी बाल आरोग्य नर्सिंगतर्फे मुलांमधील कुपोषण व भारतातील परिचारीकांसाठी धोरणे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मिनी राणी मेरीबेथ व्याख्याता, किंग फैसल विद्यापीठ, अल अहसा, राज्य सौदी अरेबिया,दि. १६ मे रोजी प्रसुती आणि स्त्रीरोग विभागातर्फे अंडी साठवण व त्यांचे संरक्षणवर डॉ सफाबी देवी एन. प्राचार्य, दानेशोरी कॉलेज ऑफ नर्सिंग, संभाजी नगर दि १७ मे रोजी मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फेे मानसिक आरोग्य उपचारासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान विषयावर डॉ.मोनिता ठोकचोम नर्सिंग कॉलेज, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, पुणे. दि १८ मे रोजी समारोप मेडीकल सर्जिकल नर्सिंग विभागातर्फे आयोजित हायपोप्निया आणि स्ट्रोक रोखण्यात त्याची भूमिका एल्बी के पॉल प्राध्यापक, चिरायू कॉलेज नर्सिंग, भोपाळ यांनी केला. विविध विषयांच्या ऑनलाईन वेबिनार मालिकेतून प्राध्यापक व विदयार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून आगामी काळातही अशा वेबिनार मालिका सतत सुरू राहणार असल्याचा मानस प्राचार्य विशाखा गणविर यांनी व्यक्‍त केला.कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागप्रमुख प्रा. जसनिथ ढाया, बाल आरोग्य नर्सिंग विभागप्रमुख प्रा.अश्‍वीनी मानकर,प्रसुती आणि स्त्रीरोग विभागप्रमुख प्रा.मिनोव देवी, मानसिक आरोग्य नर्सिंग विभागप्रमुख प्रा. अश्‍वीनी वैदय, मेडीकल सर्जिकल नर्सिंग विभागप्रमुख प्रा. मनोरमा इसाक तसेच शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button