गुन्हेगारी
१६ वर्षी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यावर गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव, : शहरातील मोदीनगरमध्ये
राहणार एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला (ता.१७) दुपारी पळवून नेणाऱ्या युवकाविरुद्ध मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आई मजुरीला गेलेली असताना मुलगी एकटीच घरी होती. कामावरून घरी परतली तेव्हा मुलगी घरी दिसली नाही. आजूबाजूला परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेतला
मात्र ती मिळून आली नाही. सदर मुलीला आरोपी सागर मनोहर तायडे रा. पिंपळखुटा ता. बार्शी टाकळी जिल्हा अकोला याने फुस लावून पळवून नेल्याचा आईचा आरोप आहे. आरोपीने या मुलीला एक वर्षा अगोदरही पळवून नेले होते. त्यावेळी आरोपीवर पोस्टे बार्शीटाकळी येथे आपण नंबर ४४/२०२३ कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. अशा फिर्यादवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे



