नैसर्गिकहवामान अंदाज
राज्यात २९ मार्च पासून सलग तीन दिवस अवकाळी पाऊस! हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा अंदाज.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
दि.२८ ; अनेकदा अचूक अंदाज दर्शवणारे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी नुकताच म्हणजे बुधवार दि.२७ मार्च २०२४ रोजी दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यातील काही भागात शुक्रवार दि. २९ मार्च २०२४ पासून सलग तीन दिवस विखुरलेल्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस येण्याचा अंदाज वर्तवला आहे , तरी राज्यातील जनतेने सतर्क राहण्याची गरज आहे असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी यावेळी केले आहे✍️.



