गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ

अज्ञात व्यक्तीने ३ मोटारसायकली पेटवून दिल्या

अज्ञात व्यक्तीने ३ मोटारसायकली पेटवून दिल्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर शेगाव,

तालुक्यातील ग्रामीण भागातील अळसणा येथील मागील तीन मध्यरात्री १ ते २ वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने मोटारसायकली पेटवून दिल्याची घटना घडली आहे. वर्षांपासून अळसणा येथे ट्रक, ऑटो व मोटरसायकली पेटवण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र, आरोपीचा पत्ता लागत नाही. जवळपास १५ मोटारसायकली ट्रक व एक ऑटो आतापर्यंत पेटवून देण्यात आला आहे. ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मोहम्मद मुजप्पीर हुसेन शेख जाकीर हुसेन वय ३४ यांचा एम. एच. २८ बी.बी. ०९१८ क्रमांकाचा ट्रक पेटवून देण्यात आला होता. यामध्ये २ लाख ५० हजाराचे नुकसान झाले होते. २२ मार्चच्या याबाबत अनंता भानुदास लांगुळकर वय ३२ रा. जळसणा यांनी शेगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. २२ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घरासमोर उभ्या असलेल्या हिरो कंपनीची एम.एच.२८ झेड- २९६८ क्रमांकाची काळ्या रंगाची दुचाकी व हिरो पेंशन कंपनीची एम.एच.२८ ए.आर.८३८६ पांढऱ्या-सित्वर रंगाची दुचाकी तसेच होंडा शाईन कंपनीची एम.एच.-२८ बी.एफ. ०३०७ क्रमांकाची – अशा तीन मोटारसायकली जाळून १ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा – दाखल केला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button