जि-चॅम्प प्री -स्कूल बुलढाणा येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी -प्रशांत चव्हाण
बुलढाणा – (दि.२४ जुलै)
ज्ञानियांचे गुरु, भक्तांचे कैवारी, पांडुरंग वसे जिव्हारी !!
आज आमच्या जि-चॅम्प प्री-स्कुल, बुलडाणा मध्ये आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात पार पडली, वारी व विठ्ठल-रुक्मिणी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
छोटे-छोटे वारकरी,आमच्या लाडक्या चिमुकल्या वारकऱ्यांनी या कार्यक्रमात अत्यंत उत्साहात आणि सुंदर सहभाग नोंदवला ,तुमच्या या सहभागामुळे हा सोहळा अत्यंत नेत्रदीपक ठरला. जय हरी विठ्ठल” नामाचा गजर करीत शाळेच्या प्रांगणात दिंडीला सुरुवात झाली .या दिंडी मुले शाळेमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले .चिमुकल्यांनी या दिंडी मध्ये आगळ्या वेगळ्या वेशभूषा धारण केल्या होत्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन! असाच सहभाग प्रत्येक कार्यक्रमात राहो, ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होईल,
सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल. प्रा.संस्थापक अध्यक्ष सचिन गवई आभार व्यक्त केले.असेच सहकार्य पुढेही लाभावे, अशी अपेक्षा.
संस्थापक अध्यक्ष -प्रा. सचिन गवई यांनी व्यक्त केली.



