70 वर्षीय वयोवृद्ध स्त्री बेपत्ता!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
रतन भगत.
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी.
सविस्तर वृत्त असे की,
सौ. कमलाबाई रामेश्वर गंगोणे ही 70 वर्षीय वयोवृद्ध स्त्री राहणार आवार तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथून आपल्या मुलींच्या घरी ग्राम लोणवाडी तालुका मलकापूर येथे काही दिवस पाहुणे म्हणून गेली .आणि दोन चार दिवस मुलीच्या घरी राहिल्यानंतर ती परत तिच्या घरी जाण्यासाठी मलकापूरच्या बस स्टैंड वर पोहोचली .मात्र तेथून ती घरी परतलीच नाही .त्यामुळे हरवलेली स्त्री म्हणजेच सौ कमलाबाई रामेश्वर गंगोणे ह्या दिनांक 2/ 11/ 2025 पासून आज तागायत बेपत्ता आहेत .त्यामुळे पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीणला त्यांचे जावई अविनाश रवींद्र खराटे राहणार लोणवाडी यांनी हरवल्या बाबतची माहिती पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण यांना हरविल्याबाबत माहिती दिली. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार पुढील तपास पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण करीत आहेत .बेपत्ता झालेल्या स्त्रीच्या परिवारात एकूण तीनच मुली आहेत. आणि त्यांचे सुद्धा लग्न झालेले आहे .त्यामुळे पोलीस स्टेशनला त्यांचे जावई अविनाश रवींद्र खराटे राहणार लोणवाडी तालुका मलकापूर यांनीच बेपत्ता झाल्याची माहिती दिली .ज्यांना ही वयोवृद्ध स्त्री मिळेल किंवा दिसेल त्यांनी पोलीस स्टेशन मलकापूरला किंवा त्यांचे जावई अविनाश खराटे त्यांचा मोबाईल नंबर 80 10 74 47 30 या नंबर वर माहिती द्यावी .असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.



