खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

तेल्हारा येथील गजानन त्र्यंबकराव शेगोकार शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी

तेल्हारा
दि.१६ सप्टें.|
तेल्हारा येथील मुळचे रहिवासी असलेले तसेच वाडेगाव येथील डॉ. नानासाहेब चिंचोळकर विद्यालयात सहाय्यक अध्यापक पदावर कार्यरत असलेले श्री गजानन त्र्यंबकराव शेगोकार यांना गत रविवारी कृतिशील शिक्षक शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) अकोला च्या वतीने दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील के.जी. टू पी.जी. पर्यंत उल्लेखनीय कार्य असणाऱ्या, तसेच अध्यापनासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या शिक्षकी पेशाची मान उंचावणाऱ्या शिक्षकांना “शिक्षकरत्न” पुरस्काराने गौरविण्याकरीता “कृतिशील शिक्षक पुरस्कार” समारंभाचे आयोजन रविवार दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी आर.एल.टी विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या निवड समितीने वर्षभर शिक्षकांचे मूल्यांकन, निरीक्षण, अवलोकन करून शिक्षकरत्न पुरस्कारासाठी मूळचे तेल्हारा येथील रहिवासी आणि वाडेगाव येथील डॉ. नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाचे सहाय्यक अध्यापक श्री गजानन त्र्यंबकराव शेगोकार यांची कृतिशील शिक्षक शिक्षकरत्न पुरस्काराकरिता निवड केली. त्यांचा सत्कार प्रमाणपत्र, सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, माजी शिक्षक आमदार श्री वसंतराव खोटरे यांच्या हस्ते तसेच विज्युक्टाचे प्रांताध्यक्ष अविनाश बोर्डे, आरएलटी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री चंद्रवंशी, मा. रतनसिंग पवार (शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अकोला), शिक्षक सेनेचे प्रदेश सचिव श्री नरेंद्र लखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
कृतिशील शिक्षक शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद, उत्साह आणि कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असून कर्तव्याप्रती वाढलेली जबाबदारी पाडण्याची सकारात्मक ऊर्जा या पुरस्कारामुळे मिळेल अशी भावना पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री गजानन त्र्यंबकराव शेगोकार यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया —

मि शिक्षकरत्न पुरस्कार निवडीचे श्रेय शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देऊन सतत उपक्रमशील, वैविध्यपूर्ण कार्य करण्यास प्रोत्साहन देणारे श्रीमती शांताबाई चिंचोळकर शिक्षण संस्था, वाडेगाव चे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, सचिव प्रा. डॉ. जगदीश चिंचोळकर, संचालिका व संचालक मंडळ यांना तसेच कृतिशील कार्य करण्यास नेहमीच सहकार्य करणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांना देतो.

शिक्षक श्री गजानन त्र्यंबकराव शेगोकार

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button