
जेलच्या भयाने घाबरले.आणि भाजपकडे गेले.
एक वर्षांपुर्वी शिवसेनेचे शिंदे आणि गिरोह ठाकरेंना सोडून भाजपकडे गेला.यांना ठाकरेंचे ध्येय धोरणे किंवा सेनेची ध्येय धोरणे आवडली नाहीत का?असे नाही.यांना भाजपची सुद्धा ध्येय धोरणे आवडत नाहीत.पण इडीच्या बेडी पेक्षा भाजपची जोडी काय वाईट? म्हणून भाजपला डोनेशन देऊन ट्युशन लावली.यात विकास वगैरे मुळीच नाही.शिंदे, गुलाबराव ,भुसे,सत्तार आणि विकास?कसे शक्य आहे?
आता तब्बल एक वर्षांनी अजितदादा, मुश्रीफ, पटेल यांचेवर इडीची टांगती तलवार होती.जेलमधे जागा रिकामी झाली की,यांना उचलणार होते.म्हणून यांनी फडणवीस यांचा सल्ला ऐकला.आपले काका वाईट नाहीत.पण आता वाचवू शकत नाहीत.मजबुरी आहे.जेल नको.त्यापेक्षा भाजपशी मेल चालेल.म्हणून अजितदादा आणि गिरोह ने भाजपला डोनेशन देऊन ट्युशन लावून घेतली.चोराचा खिसा तपासल्याशिवाय,रिकामा केल्याशिवाय पोलिस त्याला मधे घेत नाहीत.
ठाकरे साहेब आणि पवार साहेब काहीही कारणे सांगितली तरीही खरे कारण आहे भ्रष्टाचार करणे व करू देणे.जर यांनी आपल्या मंत्र्यांना भ्रष्टाचार करण्यापासून अडवले असते तर आज ही पाळी ठाकरे आणि पवार यांचेवर आली नसती.मी आधीच म्हटले होते, लिहीले होते की, पवार साहेब मातीचे पाय असलेले सैनिक घेऊन तुम्ही भाजप विरोधात लढू शकत नाही.
ज्या पक्षांचे आमदार खासदार मंत्री भ्रष्टाचार करतात त्या पक्षांवर हिच वेळ येते.हिच वेळ २०१४पर्यंत कांग्रेस वर आली होती.या मुर्खांनी आण्णा हजारे व रामदेव बाबा ला अटक केली होती.राजनिती सोडून चोरनिती केली.म्हणून भाजप ला अनायासे सत्ता मिळाली.
ठाकरे साहेब आणि पवार साहेब यापुढे तुम्ही चोरांना पक्षात घेऊ नका.कोणी चोर आला तरीही उमेदवारी देऊ नका.चोराला चोरासारखी वागणूक द्या.चार हात लांब ठेवा.तरच तुमचा पक्ष टिकून राहिल.नेपोलियन ने चोरी केल्यावर त्याला पोलिसांनी पकडले.बेड्या घातल्या.तेंव्हा त्याने पोलिसांकडे ईच्छा व्यक्त केली की,मला एकदा आईला भेटू द्या.जेंव्हा तो आईजवळ गेला तेंव्हा त्याने आईच्या कानाला चावा घेतला.का?मी आधी लहान लहान चोरी करीत होतो, तेंव्हा तू मला अडवले नाही,समजावले नाही.म्हणून मी मोठी चोरी करु लागलो.पकडला गेलो.याला आई सुद्धा जबाबदार आहेस.म्हणून ही शिक्षा.ठाकरे आणि पवारांनी या आधी आपल्या पक्षातील चोर मंत्र्यांचे कान धरले असते तर आज ही वेळ आली नसती.
आताची परिस्थिती कांग्रेस ला फायदेशीर ठरणार आहे.मरगळ झटकून कामाला लागले पाहिजे.दारूडे,बेवडे,मुके ,बहिरे,वेडे,बावळे पदाधिकारी काढून कार्यक्षम व प्रामाणिक लोकांना पदांची जबाबदारी सोपवली पाहिजे.कोण दारू देईल,कोण मटण देईल,कोण पैसा देईल याची अपेक्षा ठेवू नका.याचा बाप कांग्रेस मधे होता का?यांची आई कांग्रेस मधे होती का?ही कंडीशन ठेवू नका.तरच मतदार कांग्रेस कडे येऊ शकतो.शिवसेना वरचा राग, राष्ट्रवादी वरचा राग,भाजप वरचा राग कांग्रेस ला फायदेशीर ठरू शकतो.पण कांग्रेस ने पर्याय दिला पाहिजे.मत झेलण्याची कांग्रेस ची झोळी फाटलेली आहे.असेल हरी तर देईल खाटल्यावरी.अशा मानसिकतेतून बाहेर पडा.आम्ही खाटेखाली झोपून राहू, मतदारांना गरज असेल तर मत देतील.असे कधीच घडणार नाही.
… शिवराम पाटील
जळगाव



