12 रुपयाच्या विम्यात चंद्रकलाबाई नारायण शेळके यांना मिळाला दोन लाख रुपयाचा धनादेश ।

पी एम एस बी वाय व पीएम जे जे बी वाय चा खातेधारकांनी लाभ घ्यावा शाखा व्यवस्थापक सेंट्रल बँक मनसगाव ।
श्याम पहूरकर शेगाव विशेष न्यूज रिपोर्टर
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी कमीत कमी प्रीमियम मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पी एम एस बी वाय ) व प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना(पी एम जे जे बी वाय ) सुरू करण्यात आली होती या योजनेमध्ये आता पी एम एस बी वाय वार्षिक वीस रुपये वय वर्ष 70 पर्यंत तर पीएम जे जे बी वाय वार्षिक 436 रुपये वय वर्ष 50 पर्यंत भरून हा विमा आपण काढू शकतो हा विमा दरवर्षी 31 मे पर्यंत आपल्या खात्यातून कपात होत असतो परंतु यासाठी आपल्या खात्यामध्ये जमा रक्कम असणे आवश्यक आहे बरेचसे खातेधारकांच्या खात्यामध्ये या काळात पैसे नसल्यामुळे त्यांचा हा विमा कटत नाही करिता ज्या खातेधारकांच्या खात्यामधून हा विमा कटलेला नाही त्या खातेदारकांनी सेंट्रल बँक मनसगाव येथील शाखा व्यवस्थापकाची संपर्क करून आपला विमा कटलेला आहे किंवा नाही तो पाहून विमा कटलेला नसल्यास त्वरित विमा करावा असे आवाहन सेंट्रल बँक मनसगावचे शाखा व्यवस्थापक वैभव सरदार साहेब यांनी केले आहे
दिनांक 25 ,5, 2022 रोजी नारायण श्रीपत शेळके राहणार भोनगाव यांचा एक्सीडेंट मध्ये मृत्यू झाला होता यांचा पी एम एस बी वाय चा सेंट्रल बँक मनसगाव येथे वीस रुपयाचा विमा खटलेला असल्याने त्यांना दिनांक 15, 11, 2022 रोजी दोन लाख रुपये मिळाले आहेत सदर दोन लाखाचा धनादेश वारस चंद्रकलाबाई नारायण शेळके यांना देण्यात आले आहे तसेच काही दिवसापूर्वीच पवन शांताराम कळंबे कालखेड यांचा सुद्धा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्यांना सुद्धा दोन लाखांचा धनादेश वारस पत्नीला देण्यात आला आहे करिता या योजनेचा लाभ समस्त खातेधारकांनी घ्यावा तसेच असा काही अपघात झाल्यास त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आधार कार्ड आणि पंचमामा रिपोर्ट घेऊन तात्काळ बँक मॅनेजर शी संपर्क करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असे शाखा व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे
फोटो
सेंट्रल बँक मनसगाव




