
तेजस्विनी वीरांगना ग्रुप व संस्कृती संवर्धन संघ यांचा उपक्रम.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
हिवरखेड
दि.10 ऑक्टों. 2024| संकल्पित संस्कृति संवर्धन संघ द्वारे हिवरखेड येथे नव्या जोशाने बालिका सशक्तिकरणा करिता विशेष अभियान राबविण्यात येत आहे. सत्य सनातन वैदिक संस्कृति सर्वात श्रेष्ठ व महान आहे. हीच आमची धरोहर आहे. अश्या महान संस्कृति चे संवर्धन करणे आमचे कर्तव्य आहे. ह्याच दृष्टिने समर्पित, संकल्पित संस्कृति संवर्धन संघ द्वारे हिवरखेड येथे बालिका सशक्ति करणा करिता विशेष अभियान राबविण्यात येत आहे. नारायणदासजी- राजकंवरदेवी टावरी स्मृति प्रतिष्ठान, संस्कृति संघ, परोपकारी सेवा समिती व
प्रशिक्षित तेजस्विनी वीरांगना, बालिकांद्वारे यज्ञ ब्रह्मा आचार्य अखिलेशजी शर्मा यांच्या मार्गदर्शनात योगेश्वर श्रीकृष्ण यज्ञशाला मध्ये भक्तिमय व आध्यात्मिक वातावरणात पंच महायज्ञ चे विधिवत अनुष्ठान संपन्न झाले.
प्रथम ब्रह्म यज्ञ मध्ये ईश्वर प्रार्थना -उपासना, संध्या , ध्यान, स्वाध्याय करुन परमेश्वराचे चिंतन केले.
द्वितीय देवयज्ञ मध्ये तेजस्विनी बालिकां द्वारे वैदिक मंत्रांना गुंजायमान करुन यज्ञ सुरभि च्या सान्निध्यात अग्निहोत्र करुन मंत्रमुग्ध केले।
तृतीय पितृयज्ञ मध्ये हिवरखेड येथील सर्व क्षेत्रातील पितृतुल्य वरिष्ठ प्रतिष्ठित महानुभाव यांचा संस्कृति संघ व मुलीं द्वारे माल्यार्पण व केसरिया पट्टिका धारण करित स्वस्ति मंत्र गुंजायमान करित स्वागत व पुजन केले।
चतुर्थ अतिथि यज्ञ मध्ये
वेदज्ञ विद्वान अतिथि आचार्य श्री अखिलेशजी यांचा माल्यार्पण, केसरिया पट्टिका, अंगवस्त्र, सम्मान राशि देऊन विशेष स्वागत-सत्कार केला।
बलिवैश्वदेव यज्ञ मध्ये
पशु-पक्षी आदि नां बलवान, सुदृढ करण्याकरिता चारा-पाणी ची व्यवस्था व निराधार अपंग लोकांसाठी अन्नदान चा संस्कृति संघ ने संकल्प केला.
आयुष्काम विधि-
पंचमहायज्ञ संयोजक नवलजी टावरी च्या दीर्घायुष्य करिता वेद मंत्राद्वारे देवयज्ञात विशेष आहुतियां प्रदान करुन उपस्थित महानुभाव व मातृशक्ति ने त्यांचे
स्वस्थ दीर्घायुष्य हेतु शुभेच्छा व आशिर्वचन दिले.
आचार्य अखिलेशजी
यांनी पंचमहायज्ञ अर्थात पांच आवश्यक दायित्व बाबतीत सारगर्भित मार्गदर्शन दिले। प्रशिक्षित तेजस्विनी वीरांगना- बालिका द्वारे राष्ट्र भक्ति, प्रभु भक्ति ची नाट्यमय भाव भंगिमा युक्त प्रेरणा दायक प्रस्तुति पाहुन नगरवासी उत्साहित व आल्हादित झाले। वरिष्ठ महोदय महाजन सर, व उपस्थित मान्यवरांनी बालिका सशक्तिकरण अभियान संदर्भात प्रशंसात्मक उद्गार व्यक्त केले ।
पंचमहायज्ञ च्या यशस्वीतेसाठी चंद्रशेखर बोहरा, आशा टावरी, नवल- निशा टावरी, विनय राठी, राजु राठी, सुनील अस्वार, संतोष व पंकज राठी, तथा टावरी परिवारातील पंकज, महेन्द्र भोपळे, रेखा-मोती फोफलिया, मंगला-दिपक तारापुरे, बबलु सुरळकर, हर्षल- सौ.वनिता, आनंद, राज, विलास घुंगड, हरी सदाणी, नागेश व तेजस्विनी बालिकांनी अथक परिश्रम घेतले.



