हिवरखेड चे पवन महाराज उंबरकार राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मानित. .

दि.6 सप्टेंबर 2026 रोजी शिर्डी येथे बी.दि.चेंज फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या भव्य सोहळ्यामध्ये ,,महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार. .सौंदर्य कला पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार या तीन मानाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. .
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार देण्यात आला असुन यामध्यें ,
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील हरहुन्नरी कलाकार पवन महाराज उंबरकार यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पवन महाराज्यांच्या कर्तृत्वाचा ,मेहनतीचा,कलेचा सन्मान म्हणजे हिवरखेड वासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.तुमच्या हातुन भविष्यातही असेच उत्तुंग कार्य घडत राहो..आणि तुमच्या यशाची उंची दिवसें दिवस वाढत जावो..हिच हिवरखेड वासियांतर्फे सदिच्छा..



