बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

हिंगणा येथे ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ ग्रंथाला धम्म प्रचारक भीमराव पाहुरकर यांची सदिच्छा भेट…….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

हिंगणा:- २८ सप्टेंबर २०२६
हिंगण्यात प्रथमच ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ ग्रंथाचे मनन-पठण धम्मविचारांच्या प्रसारासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट धम्मज्ञानाच्या प्रकाशाने उजळले हिंगणा भीमराव पाहुरकर यांची उपासक-उपासिकांना मोलाची मार्गदर्शक माहिती
संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा गावात प्रथमच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पवित्र व ज्ञानप्रबोधन करणाऱ्या ग्रंथाचे वाचन, मनन व पठण सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमातून भगवान बुद्धांच्या धम्माचा, समता-बंधुता आणि मानवतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी धर्मप्रचारक भीमराव पाहुरकर, कुंभारखेड तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश पाहुरकर यांनी हिंगणा येथे उपस्थित राहून ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित उपासक-उपासिकांशी संवाद साधत भगवान बुद्धांचा धम्म, त्यातील मानवतावादी विचार, समता, करुणा, प्रज्ञा आणि सदाचाराचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. धम्म हा केवळ ग्रंथवाचनापुरता मर्यादित न राहता तो आपल्या आचरणातून समाजात रुजला पाहिजे, असा संदेशही त्यांनी उपस्थितांना दिला.
विशेष म्हणजे, वेळात वेळ काढून त्यांनी हिंगणा गावात येत या ग्रंथवाचन उपक्रमाला दिलेली भेट ही समाजासाठी प्रेरणादायी ठरली. त्यांच्या उपस्थितीमुळे उपासक-उपासिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून धम्मवाचनाची ही ज्योत अधिक व्यापकपणे प्रज्वलित करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
‘ज्ञानातून प्रबोधन, प्रबोधनातून परिवर्तन आणि परिवर्तनातून समतेचा समाज’ या विचारांना बळ देणारा हा उपक्रम हिंगणा गावाच्या सामाजिक व धम्मविषयक वाटचालीतील महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या सदिच्छा भेटीबद्दल नमो बुद्धाय मित्र मंडळ, हिंगणा आणि सुजाता महिला संघ, हिंगणा यांच्या वतीने धर्मप्रचारक भीमराव पाहुरकर व सामाजिक कार्यकर्ते रमेश पाहुरकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला,
ज्यांनी ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर केला,
त्यांच्या विचारांची ज्योत आजही मनामनांत तेवत आहे,
म्हणूनच बाबासाहेबांची लेखणी आजही समाजाला दिशा देत आहे……

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button