स्वतःचे रक्त काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन; सरपंच सुवर्णाताई टापरेंचा शेतकऱ्यांसाठी लढा…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- १५ जून २०२६
पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे यांनी तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची आणि सध्या झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. पिकांवर संकट ओढवले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करून कर्जमाफी व नुकसानभरपाईचा निर्णय घ्यावा, अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रक्ताने निवेदन सादर करण्यासारखी वेळ शेतकऱ्यांवर येणे ही दुर्दैवी बाब असून शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, शेतकऱ्यांच्या अश्रूंना न्याय मिळावा म्हणून सरपंचांनी रक्ताची शाई करून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तेजराव भाऊ मारोळे, संतोष भाऊ राजनकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गणेश टापरे, ग्रामपंचायत सदस्य प्रियाताई गोल्हर, महिला काँग्रेस अध्यक्षा वैशालीताई खीरोडकार, अभयसिंग मारोळे, विलास भाऊ कंकाळ, ज्योतीताई कंकाळ, जयश्रीताई कंकाळ, पुष्पाताई कंकाळ, गणेश मानखैर, बबलू भाऊ मानखैर, जगन्नाथ बावस्कर, प्रमोद गढे, नागेश खराटे, संदीप खराटे, विजय माळोकार, अशोक हातेकर, सुधाकर डाखोडे, मंगेश शेळके, कैलास खराटे, आकाश बोरसे, अनंता खराटे, अविनाश बावस्कर, योगेश बाजोळ, राजेश परमाळे, रोशन भोंगळे, दत्ताभाऊ गाळकर, चेतन टापरे, उमेश चव्हाण, सुयोग मेतकर, यश भोंगळे यांच्यासह तालुक्यातील व गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागण्यांची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा येत्या आठ दिवसांत यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे यांनी दिला. रक्ताचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या वेदना मांडतो शासनाने तात्काळ न्याय द्यावा…….✍️



