बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवरील खोटे गुन्हे रद्द करण्यासाठी काँग्रेसची निदर्शने….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली…. प्रतिनिधी
आरुणा दत्तात्रय खंडागळे

सत्ताधाऱ्यांचा संस्थेच्या विश्वस्तांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव : प्रकाश पाटील अवचार

बुलढाणा : परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे हे राजकीय दबावातून आणि वैयक्तिक सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीने १५ जून सोमवार रोजी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राहुलभाऊ बोंद्रे आणि संस्थेच्या विश्वस्तांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे.

ज्या तक्रारदारांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली, त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे खंडणीचे आरोप झालेले आहेत. संस्थेच्या अध्यक्षांशी असलेल्या जुन्या वैमनस्यातून आणि राजकीय आकसापोटी ही तक्रार करण्यात आली आहे. हे खोटे गुन्हे तात्काळ रद्द न झाल्यास काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,असा इशाराही त्यांनी दिला

जयस्तंभ चौकातून निघालेला मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर दाखल करण्यात आलेले खोटे, राजकीय व वैयक्तिक सूडबुद्धीने प्रेरित गुन्हे तात्काळ रद्द करावेत. तसेच शासनाची दिशाभूल करणाऱ्या खंडणीखोर तक्रारदारांवर तसेच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेली परमहंस रामकृष्ण मौनी बाबा ✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button