“शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडा पण केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर वैयक्तिक टीका अयोग्य” – युवासेना संपर्क प्रमुख अनमोल ढोरे पाटील,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :- प्रशांत चव्हाण
चिखली : (दि.15जून) शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करणे,शासनाला प्रश्न विचारणे आणि जनतेच्या समस्या मांडणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मात्र या आंदोलनांच्या माध्यमातून केवळ राजकीय व्यक्तींना लक्ष्य करून वैयक्तिक टीका करणे योग्य नसल्याची भूमिका युवासेनेचे संपर्क प्रमुख अनमोल ढोरे पाटील यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याविषयी करण्यात आलेल्या अलीकडील वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
अनमोल ढोरे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील तील शेतकरी आज वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात आहे. उत्पादन खर्चात वाढ, शेतीमालाला हमीभावाचा प्रश्न, नैसर्गिक आपत्ती, सिंचनाचा अभाव, पीकविमा, वीज प्रश्न आणि बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित चर्चा होणे अपेक्षित असताना काही लोक केवळ राजकीय टीका करण्यात वेळ घालवत आहेत.
त्यांनी म्हटले की, राज्य शासनाच्या अखत्यारीतील अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनाच सातत्याने लक्ष्य केले जात आहे. लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु टीका ही विषयांवर आधारित असावी. एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करून राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही.
ढोरे पाटील यांनी पुढे सांगितले की, प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्याच्या राजकारणापासून राष्ट्रीय राजकारणापर्यंतचा प्रवास जनतेच्या विश्वासावर केला आहे अनेक दशकांच्या सार्वजनिक जीवनातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.



