स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून काम बंद आंदोलन.

.जी डी रोकडे खामगावप्रतिनिधी
बुलढाणा..जिल्हा
पाणी व स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत स्वच्छ भारत मिशन व जनजीवन मिशन कार्यरत कर्मचाऱ्यांचे आंदोलन.. दि.4 फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन सुरू सुरू.जिल्हा व तालुका स्तरावर हे ग्रामपंचायत मधील प्रत्यक्ष मूलबजावणी क्षेत्र तपासणी लाभार्थी समन्वय ऑनलाईन नोंदी आणि अहवाल सादरीकरण यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील नियोजन व देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहेत. चार महिने मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे घर भाडे मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय खर्च भरणे कठीण झाले आहे तरी ते सेवेत कार्यरत आहेत. चार महिने मानधन न मिळाल्याने आर्थिक ताण आहे तरी सेवा सुरू ठेवत आहेत असे महाराष्ट्र राज्य बांधणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने सांगितले. तथापि अनेक राज्यस्तरीय प्रतिनिधित्व करूनही परिस्थिती सुधारायची सुधारत नसल्याने संस्थेने न्यायासाठी आणि आवश्यक्य कारवाईसाठी मानव अधिकार आदेशात तक्रार नोंदवली आहे. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यभर आंदोलनाची ठाम भूमिका घेतली आहे…..



