मलकापूरमहाराष्ट्र
बेताल वक्तव्य करणाऱ्या अमित शहा याचा मलकापूर शिवसेने तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाहीर निषेध

मलकापुर प्रतिनिधी ( शेख निसार) :- घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री अमित शहा याचा मलकापूर शहर शिवसेनेतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज दि.20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर निषेध करण्यात आला, यावेळी मलकापूर शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शेख समद कुरेशी, किसान सेना शहर प्रमुख सै.वसीम सै रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले,कामगार सेना शहर प्रमुख हरिदास गणबास, संतोष बोरले,इमाम शहा,यासीन कुरेशी, हसन गौरी, इसाक तेली,हाशीम भाई, जुबेर भाई, इमरान भाई सह शिवसेना पदाधिकार्यांची उपस्थिती होती.



