बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भूमी अभिलेख कर्मचारी संपामुळे जमीन मोजणीत अडथळा ?शेतकऱ्यांचे जमिनी मोजण्याचे शेकडो मोजणी अर्ज प्रलंबित!!! सोबत आनंदाची बातमी दोनशे रुपयात होणार पोटहिस्याची मोजणी!!!

स्टार भारत लाइव एक्सप्रेस, 


तालुका प्रतिनिधी संग्रामपूर,


रतन भगत. 


  सविस्तर वृत्त असे की सातबारा उताऱ्यावरील एकाच कुटुंबातील व्यक्तींना आता आपापल्या पोट हिस्स्याची मोजणी अवघ्या दोनशे रुपयात करून मिळणार आहे अर्जदारास नियमित मोजणीच्या निकषांप्रमाणे 90 दिवसात त्याच्या क्षेत्राची मोजणी करून हद्दी निश्चित करून दिल्या जाणार आहेत अनेक शेतकऱ्यांनी पोट हिस्स्याच्या मोजणीसाठी अकोला भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केलेले आहेत मात्र 18 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या भूमी अभिलेख अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील अनेकसेकडून अर्ज प्रलंबित आहेत शेतजमीन जागा याच कारणावरून रक्त नात्यात देखील वाद होत आहेत बांध पोखरणे अतिक्रमण अशा बाबींवरून टोकाचे वाद होत आहेत त्यातून अकोल्याच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे दररोज अनेक शेतकरी क्षेत्र मोजणीसाठी अर्ज करत आहेत अनेक जण मोजण्यासाठी पोलिसांची मदत घेत आहेत या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्या अंतर्गत सातबारा उतारावरील एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा पोट हिस्सा अवघ्या दोनशे रुपयात मोजून मिळणार आहे परंतु भूमी अभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने मोजणीसाठी काही विलंब लागू शकतो शासनाच्या या निर्णयानुसार ऑनलाइन अर्ज केलेल्यांना नियमित मोजणीच्या निकषानुसार तीन महिन्यात त्यांच्या क्षेत्राची मोजणी करून मिळेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली मात्र सध्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या संपामुळे पोटहिस्सा मोजणीसाठी आलेले अर्ज प्रलंबित आहेत त्यांना या नवीन निर्णयाचा फायदा होऊ शकतो. सूत्रांकडून अशी माहिती मिळाली. 

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button