जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीयविदर्भ

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर येथे नवीन विश्रामगृह शासकीय इमारत बांधकामास मंजुरी
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर येथे नवीन विश्रामगृह शासकीय इमारत बांधकामास मंजुरी

मुक्ताईनगर प्रतिनिधी

.
मुक्ताईनगर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व इंदोर- छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) महामार्गावर मध्यवर्ती शहर असून आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनित झालेले तीर्थक्षेत्र असल्याने हे धार्मिक व पर्यटन स्थळ आहे त्यामुळे येथे बाहेरून येणाऱ्या प्रवासी व पर्यटक तसेच भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता. यासाठी त्यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून जागेचे स्थळ निरीक्षण , नकाशा तसेच अंदाज पत्रक तयार करणे आदी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सा.बा. विभागातर्फे यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला होता. तसेच आमदार पाटील यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच विद्यमान मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागनी केलेली होती. त्यानुसार मंत्री चव्हाण यांनी मागणीला हिरवी झेंडी दिल्याने मुक्ताईनगर येथे नवीन शासकीय विश्रामगृह इमारत बांधकाम करणे (६.२५ कोटी) मंजूर केलेले आहेत. अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button