मृत्यूनंतरही वेदना कायम स्मशानभूमी नसल्याने नाल्याकाठी केला जाताहेत अंत्यसंस्कार

श्याम पहुरकर
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव विशेष न्यूज रिपोर्टर

मृत्यूनंतरही वेदना कायम स्मशानभूमी नसल्याने नाल्याकाठी केला जाताहेत अंत्यसंस्कार
शेगाव तालुक्यातील कनारखेड गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे त्या ठिकाणी मृतदेहावर 4 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार नाल्याच्या काठावर करण्याची वेळ आली आहे त्याकडे प्रशासनाचे लोकप्रतिनिधी कडून तेवढेच दुर्लक्ष होताना दिसत आहे शेगाव तालुक्यात 29 गावांमध्ये मशानभूमी नसल्यामुळे अद्यापही मशानभूमी नाहीत गावात स्मशानभूमी नसल्यामुळे खुद गावातील आजी माजी सरपंच चा नातेवाईकांची अंत्यसंस्कार रस्त्यावरच करावा लागत आहे विशेष म्हणजे कनारखेड येथील गावकऱ्यांनी आमदार खासदार तहसीलदार कलेक्टर मंत्री यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल घेण्यात येत असताना दिसत नाही मशानभूमींना प्राधान्य देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश गुलाबराव पाटील दहा नोव्हेंबर जिल्हा नियोजन समितीच्या राबविण्यात येणार आहे असे आश्वासन दिले होते मात्र विकासाच्या दृष्टीने
कनारखेड कोसो दूर आहेत गावात 75 वर्षानंतरही स्मशानभूमीस नाही मशानभूमी नसल्यामुळे ज्यांच्याकडे शेती आहे त्या कुटुंबातील व्यक्तींचे निधन झाल्यास त्यांचा अंत्यविधी शेतात केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही त्या कुटुंबातील व्यक्तींचा अंत्यविधी नाल्याच्या काठावर किंवा पावसाळा सुरू असल्यास रस्त्यावर करावा लागतो ही परिस्थिती दोन पिढ्यापासून सुरू आहे आज पर्यंत या कनारखेड येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार पालकमंत्री यांना एक अनेक वेळा निवेदन दिली मागणी केली मात्र अद्याप मशानभूमी चा प्रश्न मार्गी लागलेला नाही
@नागरिकांचा आंदोलनाचा इशारा आता तात्काळ स्मशानभूमी मिळावी अन्यथा यानंतर गावात एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्यांचा अंत्यविधी शेगाव तहसील दारांच्या कार्यालयात करू मागील वेळेस महिला मयत झाल्यास कनारखेड येथील गट ग्रामपंचायत गायगाव येथे गावकऱ्यांनी अंत्यविधी करणार होते त्यावेळी तहसीलदारांनी गावकऱ्यांना आश्वासन देऊ लवकरच स्मशानभूमीचा कनारखेड करण्यात येईल अशा आश्वासन दिले होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते देवलाल वाकोडे गावातील नागरिकांनी दिला आहे




