बुलढाणामहाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस आक्रमक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये अनुदान द्या तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.8 येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांचे अनुदान द्या अशी मागणी करीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तेल्हारा तहसील कार्यालयावर धडक दिली उन्हाळ्यातील अवकाळी पाऊस व गारपीट मुळे तेल्हारा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून एकरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने करीत तेल्हारा तहसील कार्यालयावर धडक दिली तेल्हारा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले तेल्हारा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असताना शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा छळ तात्काळ थांबून सर्व शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली यावेळी तेल्हारा तालुक्यातील व तेल्हारा शहरातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button