महाराष्ट्रविदर्भ
सोयाबीनच्या गंजीला आग लावून ७० हजाराचे नुकसान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
शेगाव तालुक्यातील झाडेगाव येथे अज्ञात इसमाने शेतात सोयाबीनच्या सोंगडी करून ठेवलेल्या गंजीला आग लावून ७० हजाराचे नुकसान केल्याची घटना काल २५ ऑक्टोबर रोजी रात्री दरम्यान घडली. शेतकरी ज्ञानेश्वर सुभाष माळी, रा. झाडेगाव यांनी शेगाव शहर पो.स्टे. ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४३५ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास नापोकों ज्ञानदेव डाबेराव है करित आहेत.



