वर्षावासानिमित्त’टीम परिवर्तन”पोहोचली संग्रामपूरच्या शेवटच्या टोकावर. पिंपरी माळेगावात परिवर्तनाच्या वतीने सामाजिक व वैचारिक मार्गदर्शक.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.३०/९/२०२६.
वर्षा वासाच्या निमित्ताने”टीम परिवर्तन “च्या संग्रामपूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पिंपरी माळेगाव या गावाला सदिच्छा भेट देण्यात आली. या भेटी दरम्यान गावातील नागरिकांना विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावकऱ्यांसाठी बुद्ध वंदनाची पुस्तके देखील देण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन आणि मार्गदर्शन .प्रा.आयु. अमोल खंडेराव सर.आयु. राहुल नितोने.आयु. मिलिंद कै. वानखडे आणि आयु. उदेभान दांडगे यांनी केले. त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत विविध सामाजिक आणि शैक्षणिक मुद्द्यावर महत्त्वपूर्ण विचार मांडला. वाचनाची संस्कृती रुजवी आणि गावातील तरुण पिढीला ज्ञानाची कपाट खुली व्हावी. या उद्देशाने यावेळी अभ्यासपूर्ण बुद्ध वंदनेची पुस्तके वाटप करण्यात आली.
या महत्वपूर्ण प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आणि टीम परिवर्तनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने आयु. अमोल दामले. आयु. शेषराव वानखडे. आयु. सुमेध वानखडे. आयु. रत्नदीप खंडेराव. आयु. प्रशांत तायडे आणि पंकज वानखडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
टीम परिवर्तनाच्या या उपक्रमामुळे पिंपरी माळेगाव येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शेवटच्या गावापर्यंत पोहोचवून ज्ञान आणि मार्गदर्शनाचा दिवा लावल्याबद्दल गावकऱ्यांनी टीमचे विशेष आभार मानले. असून टीम परिवर्तनाच्या या सामाजिक आणि वैचारिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



