सेवासंकल्प अभियान ; भटके-विमुक्त नागरिकांसाठी २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान विशेष मोहिम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि.25 : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना तसेच आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
‘सेवासंकल्प अभियान’ व ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील भटके-विमुक्त समूहाची लोकसंख्या अधिक असलेल्या वस्त्यांमध्ये तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
तालुकानिहाय शिबिरांचे नियोजन:
खामगाव : शिराळा – २७ सप्टेंबर, उमरा – २८ सप्टेंबर, मांजरी – २९ सप्टेंबर.
मोताळा : चिंचखेड नाथ – २७ सप्टेंबर, बोऱाखेडी – २८ सप्टेंबर, लपाळी – २९ सप्टेंबर.
शेगाव : शेगाव – २७ सप्टेंबर, मनसगाव – २८ सप्टेंबर, जावळा – २९ सप्टेंबर.
जळगाव जामोद : मोहितेपूर – २७ सप्टेंबर, नाव बुद्रुक – २८ सप्टेंबर, उसरा – २९ सप्टेंबर.
देऊळगाव राजा : अमृतनगर – २७ सप्टेंबर, दिग्रस – २८ सप्टेंबर, अंढेरा – २९ सप्टेंबर.
बुलढाणा : पिंपरखेड – २७ सप्टेंबर, कुंभफळ – २८ सप्टेंबर. लोणार : पांग्रा डोळे – २७ सप्टेंबर, जाबुळ – २८ सप्टेंबर.
मेहकर : मेहकर (खंडाळा वस्ती) – २७ सप्टेंबर, जानेफळ – २८ सप्टेंबर, हिवरा आश्रम – २९ सप्टेंबर.
सिंदखेड राजा : राहेरी बु. – २७ सप्टेंबर, दुसरबीड – २८ सप्टेंबर.
चिखली : घोलद – २७ सप्टेंबर, घाणमोड – २८ सप्टेंबर, तांदुळवाडी – २९ सप्टेंबर.
नांदुरा : गोसिंगा – २७ सप्टेंबर, नांदुरा – २८ सप्टेंबर.
संग्रामपूर : संग्रामपूर – २७ सप्टेंबर, वरवट बकाल – २८ सप्टेंबर, सोनाळा – २९ सप्टेंबर.
मलकापूर : धरणगाव – २७ सप्टेंबर, जांभूळ धाबा – २८ सप्टेंबर, दाताळा – २९ सप्टेंबर
जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.



