जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्ररावेर

सुखी नदीपात्रातून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कारवाई!

तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाची कारवाई; ट्रॅक्टर ताब्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जळगाव जिल्हा प्रधिनिधी
विनोद तायडे

उटखेडा : सुखी नदीपात्रातून वाळू, रेतीसह गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल प्रशासनाने उटखेडा-कुंभारखेडा रस्त्यावर धडक कारवाई केली. तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने संशयास्पद ट्रॅक्टर अडवून त्याची तपासणी केली. या कारवाईमुळे गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११ वाजता उटखेडा-कुंभारखेडा रस्त्यावर सुखी नदीपात्रातून गौण खनिज (वाळू/रेती) वाहतूक करणारे ट्रॅक्टर येत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. माहितीच्या आधारे महसूल पथकाने संबंधित मार्गावर सापळा रचून संशयास्पद ट्रॅक्टर थांबविला.

यावेळी ट्रॅक्टर क्रमांक MH 30 BL 1594 याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रॅक्टर चालक निशांत वसंत इंगळे याच्याकडे गौण खनिज वाहतुकीसाठी आवश्यक वैध परवानगी अथवा रॉयल्टी पावती आढळून आली नसल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.

तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाची कारवाई

या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी उटखेडा कैलास चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी मुंजलवाडी कमलाकर हाटकर तसेच ग्राम महसूल अधिकारी सहस्रलिंग अंकित भोगवाडे यांच्या पथकाने सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.

महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे नदीपात्रातून होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित वाहनाची कागदपत्रे, गौण खनिजाचा स्रोत, रॉयल्टी तसेच वाहतुकीची परवानगी याबाबत पुढील तपासणी करण्यात येत आहे.

गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाचा ‘वॉच’

नदीपात्रातून वाळू अथवा इतर गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करताना शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाकडून अशा वाहनांची तपासणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

उटखेडा-कुंभारखेडा परिसरात झालेल्या या कारवाईनंतर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांवरही प्रशासन कारवाई करणार का? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गौण खनिजाच्या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने सातत्याने तपासणी व कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button