महाराष्ट्र

*जि.प.प्राथमिक शाळा,दरेगाव येथे डाॕ.आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न .*

*दरेगाव* – (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.याप्रसंगी प्रतिमापुजन, विद्यार्थ्यांची भाषणे,भीमगीते गायन ,खाऊवाटप इ.कार्यक्रम संपन्न झाले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री.सूर्यकांत गरूड सर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी प्रतिनिधी मंगेश खैरनार होते.
  भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य ,राज्यघटना निर्मितीमागील त्यांची भूमिका,त्यांनी केलेला संघर्ष व कमावलेली प्रज्ञा अनेक पिढ्यांना प्रेरणादायक ठरेल असे मत प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना श्री.गरुड सर यांनी व्यक्त केले. भाषण करणा-या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली.
  शाळेचे मुख्याध्यापक श्री.जनार्दन देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विद्यार्थी ओम गांगुर्डे याने सुत्रसंचलन केले.
   या जयंतीनिमित्ताने विद्यार्थांना खाऊवाटपही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.श्री.साहेबराव देवरे,श्री.रविराज पाटील ,श्रीमती शोभना बिरारी,श्री.बाळा सावंत ,श्री.दीपक निकम,श्रीमती वाल्याबाई बोरसे,श्रीमती वैशाली पवार व श्री.रमेश राऊत सर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
महेश देवरे याने उपस्थितांचे आभार मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button