जळगावा जिल्हामलकापूरमहाराष्ट्रविदर्भशेती

पिक-विमा प्रश्नावर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांची संग्रामपूर कृषी कार्यालयावर धडक..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस राम इंदोरे बुलढाणा प्रतिनिधी

पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम वितरीत केल्याने शेतकरी आक्रमक.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या AIC कंपनीची चौकशी करून कारवाई करावी व शेतकऱ्यांना १००% पिक विमा नुकसानभरपाई देण्यात यावी अन्यथा सरकार व विमा कंपनीच्या विरोधात स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार असल्याचा ईशारा प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला..

जिल्ह्यातील पिक विम्याच्या मदतीपासून वंचित असलेल्या ४६ हजार शेतकऱ्यांना अंदाजे ६७ कोटी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर लवकरच जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी आयुक्त सहसंचालक विजयकुमार आवटे यांनी प्रशांत डिक्कर यांच्याशी भ्रमणध्वनीवर बोलताना दिली..

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सारखेच नुकसान झालेले असताना सुद्धा विमा कंपनीने जाणिवपूर्वक कमी जास्त विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करून शेतकरी पूर्णपणे संभ्रमात पडला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button