महाराष्ट्रविदर्भ

12 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

जळगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे (३२) व विद्युत पर्यवेक्षक दिपक शेळके (३०) या दोघांना तक्रारदाराकडून शहरातील पथदिव्यांच्या देखभाल व दुरूस्ती कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून कंत्राटदाराकडून १२ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना आज सकाळी ११ वाजता सुमारास घडली. या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव जामोद शहरातील पथदिव्यांच्या देखभाल

दुरुस्तीच्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाच मागितली होती. लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे या संबंधीची तक्रार कंत्राटदाराने लाचपुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर या विभागाच्या पथकाने आज सकाळी ११ वाजेच्या सुमारात सापळा रचून ३२ वर्षीय मुख्याधिकारी आकाश डोईफोडे

आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके (३०) या दोघांना तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच घेताना नगर परिषदेतच रंगेहात पकडले. विशेष म्हणजे आरोपी मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक हे दोन्ही युवा असून आकाश डोईफोडे हा अहमदनगर जिल्ह्यातील तर दीपक शेळके हा मोताळा तालुक्यातील उबाळखेडचा मूळ रहिवासी आहे. सदरची कारवाई पो. उपअधिक्षक श्रीमती शितल घोगरे. व पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, महेश भोसले, स.फौ. शाम भांगे, पोहेकों विलास साखरे, प्रवीण बैरागी, रवी दळवी, पोना जगदीश पवार, विनोद लोखंडे, पोकों शैलेश सोनवणे, मपोकों स्वाती वाणी आणि चालक पोना नितीन शेट्ये, पोकों अरशद शेख सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या पथकाने केली आहे. त्यांना मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र आणि देविदास घेवारे, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button