मुक्ताईनगर

साई चौकाजवळ अतिक्रमण पुन्हा वाढवले; नगरपंचायतीच्या कारवाईला सुरूंग?

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर नगरपंचायतकडून हातगाडी व्यवसाय धारकांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या असून कारवाई सुरू आहे. परंतु या कारवाईला धाब्यावर बसवत काही व्यवसायिकांनी पुन्हा एकदा अतिक्रमण सुरू केले आहे. साई चौकाजवळील परिसरात काही ठिकाणी अतिक्रमण जागेवरच पक्की दुकाने उभारण्यात आली असून, रोडापर्यंत सिमेंट काँक्रीटचे ओटे टाकून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास येत आहे.

विशेष म्हणजे, नगरपंचायतीच्या थेट नजरेसमोर हे अतिक्रमण सुरू असूनदेखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या कारवाईचा निष्कर्ष आणि कार्यक्षमता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे की, या अतिक्रमणामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यता देखील वाढली आहे.

नगरपंचायतीने याप्रकरणी तातडीने आणि कठोर पावले उचलून पक्क्या अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देखील काही स्थानिक संघटनांनी दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button