मराठा पाटील समाज वधु वर परिचय मेळावा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी
श्याम पहूरकर
शेगाव मराठा पाटील युवक
समिती शेगाव तालुक्याच्या वतीने आज दिनांक २८ डिसेंबर रोजी स्थानिक श्री गणेश प्रस्थ वै. पुरुषोत्तम हरी गणेश पाटील नगर खामगाव रोड शेगाव येथे उपवर युवक युवती व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात हजारो नागरिक उपस्थित होते तर या कार्यक्रमाला ५०० च्या वर उपवर युवक युवतीच्या नोंदणी झाल्या आणि प्रत्यक्ष शेकडो च्यां वर युवक युवती यांनी उपस्थिती देऊन स्वतःचा परिचय दिला. यासोबतच समिती वतीने प्रकाशित समजतील उपवर युवक युवती परिचय असलेली सोयरिक पुस्तिकेचे प्रकाशन सुद्धा यावेळी करण्यात आले.
यावेळी मंचावर उपस्थित मान्यवर आणि समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ज्यांनी सोयरिक पुस्तिकेसाठी परिश्रम घेतले यांच्या हस्ते सोयरिक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले हे
विशेष. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर पाटील, संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे, सोयरिक पुस्तिका संपादक रमेश काका टिकार, रविकांत पाटील, अकोश अमानकर, राजेंद्रा मोहोकार, कोमलताई तायडे, श्रीधर पाटील, अॅड. श्रीकृष्ण ढगे, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, छोटू पाटील, वारूळकर सर, माणिकराव गावंडे, सभापती कृ. उ. बा. समिती शेगाव गोपाळराव मिरगे यांच्या सह उपस्थित युवक युवती व महिला या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करुन केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि प्रास्ताविक गजानन खाँड यांनी केले, संस्थापक अध्यक्ष गाजनान ढगे यांनी
समितीच्या कार्याची माहिती दिली तसेच वधुवर परिचय मेळावा समाजा साठी किती उपयोगी आहे हे सांगितले. परिचय पत्र वाचन नंदलाल उन्हाळे, प्रा. कल्याणी उन्हाळे यांनी केले. सदर उपक्रमाला समाज बांधवांनी स्वतः हुन आर्थिक देणगी, भोजन व्यवस्था, भोजन साठी लागणारे साहित्या व इतर प्रकारे मदत देऊन सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाला जिल्ह्यतील व समाजातील सामाजिक कार्यकर्ते व नेते. माजी. गृह राज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील, सचिन तायडे सा.बा. विभाग जळगाव जा., प्रवीण पुंडकर सा.बा. विभाग खामगाव, बलदेवराव चोपडे यांनी आवर्जून भेट दिली यासोबतच
समिती जिल्हा कार्याध्यक्ष मोहन घुईकर, अविनाश कुटे, श्याम मोरखडे, राम पारस्कर, प्रतीक मिरगे, निवृत्ती दिवाणे, रामा श्रीपाद भगत, अतुल राजेश कुईटे, गौरव खुमकर, अंकित हिवाळे विध्यार्थी नांदुरा अध्यक्ष, संग्रामपूर तालुकाध्यक्ष संदीप जळमकर, सचिन अंभोरे, वैभव टिकार, कृष्णा जवंजाळ, अमोल टिकार, शुभम लांडे ऋषी पन्हाड, पवन लांडे, सौरभ बाप्पु मुकुंद, श्याम अढाव, रामेश्वर निकामे, विजय अढाव, प्रफुल्ल बिचारे, विष्णू वाठे, भूषण दाभाडे, सदानंद पुंडकर यांच्या सह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख तसेच हजारो नागरिक उपस्थित होते.



