हिंदुत्ववादी विचारसरणी जपत समाजहितासाठी झटणारे, तरुणाईत कार्याची जिद्द आणि संघटनात्मक बांधिलकी जपणारे

( प्रतिनिधी. राजेंद्र मुंडे गजानन
उर्फ पिंटू धोरण (पाटील) खामगाव शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती म्हणून हे नाव आज अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
आपल्या तरुण वयातच त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी आवाज उठवण्याचे धाडस दाखवले. अन्यायाविरुद्ध भूमिका घेणे, गरज पडली तर आंदोलन, मोर्चे आणि संघटनात्मक कार्यात अग्रेसर राहणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे.
पिंटू धोरण यांच्या कार्यप्रवासात त्यांना लाभली ती प्रखर हिंदुत्ववादी नेतृत्वाची साथ. विशेषतः अँड अमोलभाऊ अंधारे यांच्यासारख्या धडाडीच्या नेतृत्वासोबत खांद्याला खांदा लावून काम करत त्यांनी अनेक सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. अमोल अंधारे यांच्या संघर्षाच्या काळात, आंदोलनांच्या वेळी आणि कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी पिंटू भाऊ नेहमी पुढे राहिले. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता आणि विश्वास निर्माण झाला. अमोल अंधारे आणि पिंटू धोरण यांचे नाते हे केवळ संघटन किंवा राजकीय नाही तर मैत्री, विश्वास आणि कार्यकर्त्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक मानले जाते.हिंदुत्ववादी विचारासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य संधी आणि न्याय मिळावा ही भूमिका जपणारे शिवसेना नेते मा. प्रतापरावजी जाधव साहेब यांनी अमोल अंधारे यांच्या खास खंदे समर्थक पिंटू धोरण यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुढे येण्याची संधी दिली. कार्यकर्त्यांची क्षमता ओळखून त्यांना संघटनेत मोठी जबाबदारी देण्याची परंपरा जपणाऱ्या नेतृत्वामुळेच अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना खामगाव शहर व तालुका मध्ये पुढे येण्याची संधी शिवसेनेत मिळत आहे हेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे व हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पक्षाचे खरे संस्कार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात पिंटू धोरण यांची उपजिल्हाप्रमुख पदी झालेली नियुक्ती ही त्यांच्या निष्ठावान हिंदुत्ववादी कार्याची आणि शोषित, वंचीत, पीडितांसाठी दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाची योग्य दखल मानली जात आहे. शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच मा. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील डिवरे, शिवसेना युवा नेते अमोल अंधारे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे, यांच्या सहकार्याने पिंटू धोरण यांना देण्यात आलेली ही जबाबदारी पुढील काळात निश्चितच संघटनात्मक कार्याला अधिक बळ देणारी ठरेल पिंटू धोरण यांनी आजपर्यंत हिंदुत्ववादी विचार जपत समाजासाठी काम केले आहे. त्यांच्या कार्यातून अनेक तरुणांमध्ये संघटनात्मक कार्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. संघर्ष, निष्ठा आणि समाजसेवेच्या बळावर कार्यकर्ता मोठा होऊ शकतो याचे ते एक उत्तम उदाहरण आहेत.
त्यांची उपजिल्हाप्रमुख पदी झालेली नियुक्ती ही केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या कार्याला मिळालेला सन्मान आहे. अशा कार्यकर्त्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास समाजकार्य अधिक व्यापक स्वरूपात घडू शकते याचा विश्वास यामुळे अधिक दृढ झाला आहे.
पुढील काळात पिंटू धोरण यांच्या माध्यमातून शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल, समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल आणि हिंदुत्ववादी विचार अधिक व्यापक पातळीवर पोहोचतील, अशी अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांना आहे.
पिंटू पाटील या नव्या जबाबदारीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या हातून समाजसेवा, संघटनात्मक कार्य आणि हिंदुत्वाचा ध्वज अधिक उंच फडकत राहो हीच भावना चाहत्या कडून व्यक्त होत आहेत.
यावेळी उपस्थित. शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील डिवरे, शिवसेना युवा नेते अमोल अंधारे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे,
शिवसेना उपशहर प्रमुख करण बिडकर, उपशहर प्रमुख करण छापरवाल, उपशहर प्रमुख राहुल ठोंबरे, विभाग प्रमुख अभिषेक तिवारी, सचिन भाऊ हेलगे, निना पाटील, आदी उपस्थित होते.



