बुलढाणा

संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी १९ महिन्याचे फरकाच्या रकमेपासून वंचित ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने आमरण उपोषण…!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी रतन भगत.

संग्रामपूर दि.६/४/२०२६ संग्रामपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सन २०२० सप्टेंबर ते मार्च २०२२ पर्यंत फरकाचे पैसे गेल्या १९ महिन्यापासून वंचित असून पंचायत समिती समोर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. संग्रामपूर तालुक्यात एकूण ५० ग्रामपंचायती असून या सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी माहे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ पर्यंत असे एकूण १९ महिन्याच्या फरक रकमेपासून वंचित असून आज पर्यंत त्यांना या १९ महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत.
संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना माहे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ मधील फरकाचे रक्कम अद्यापही मिळालेली नाही. तालुका जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी लेखी निवेदन दिले व तालुका जिल्हा प्रशासन सोबत बैठक घेऊन फक्त या प्रशासनापासून यांना आश्वासनेच मिळाले परंतु गेल्या १९ महिन्यापासून संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचे फरकाचे रकमे पासुन अद्यापही वंचित आहेत. त्यांना १९ महिन्याचे अद्यापही वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध तीव्र असा असंतोष निर्माण झाला असून ग्रामपंचायत कर्मचारी व त्यांचे कुटुंब अत्यंत आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. या अशा परिस्थितीमुळे काही कर्मचारी मानसिक तणावात गेलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लोकशाही मार्गाने अखेर संग्रामपूर पंचायत समिती समोर ग्रामपंचायत महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने तालुका अध्यक्ष श्रीराम निमकर्डे, युनियनचे सचिव संजय भिसे, योगेंद्र थोरात, प्रवीण कराडे, गजानन मोरखडे, शिवाजी कासदेकर, श्याम खंडेतोड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन ठोस निर्णय घेऊन जोपर्यंत फरकाची रक्कम या ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना देत नाही तोपर्यंत या ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button