महाराष्ट्रसामाजिक

श्री स्वरांगिनी शास्त्रीय संगीत क्लासेस चा प्रथम वर्धापन दिन व गुरुपूजन सोहळा .वासिंद

श्री स्वरांगिनी शास्त्रीय संगीत क्लासेस चा प्रथम वर्धापन दिन व गुरुपूजन सोहळा .वासिंद –

( सचिन शेलवले )

दिनांक २६ डिसेंबर २०२२ या दिवशी श्री स्वरांगिनी शास्त्रीय संगीत क्लासेसचा प्रथम वर्धापन दिन व गुरुपूजन सोहळा अंजनीया कॉम्प्लेक्स स्वामी विवेकानंद नगर, वासिंद (पूर्व) या ठिकाणी पार पडला . या स्वरांगिनी क्लासेसची संचालिका सौ . दिपाली राव व आयोजक श्री . दिपक मंगल राव यांनी कार्यक्रम आयोजित केला होता . कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य भागवताचार्य गणेश जी महाराज पुलकुंठवार, ह .भ .प . श्री जगन्नाथ महाराज पाटील, प्रेरणास्थान ह . भ .प . गोविंद जी महाराज तरणे, श्रद्धास्थान मठाधिपती गुरुवर्यय धनंजयदासजी महाराज, पूजनीय सेवाधारी ह.भ.प. सावळारामजी महाराज शिंगोळे इगतपुरी यांच्या कृपाशिर्वादाने झाली . तबला साथ यशंवत वैष्णव यांचे शिष्य कौस्तुभजी तळेकर , महाराष्ट्रातील प्रसिद्ध संवादिनी वादक तन्मयजी देवचक्के यांचे शिष्य अंकितजी कुंभार व गुरुवर्य बाळासाहेब वायकर यांचे शिष्य संवादिनी वादक रुपेशजी गोंधळी तसेच मयुरजी भास्कर यांनी मृदंग साथ केली.त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका गुरुवर्य सुरमणी सौ . भाग्यश्रीताई देशपांडे व स्वरांगिनी क्लासेसच्या संचालिका सौ .दिपाली राव यांना संवादिनी साथ दिली .मृदुंग सेवक ह .भ .प .मयुरजी महाराज भास्कर यांच्या मार्गदर्शनाने , गुरुवर्य मयुरजी भास्कर यांचे शिष्य मृदुंग साथ प्रभात दिपक राव , गुरुवर्य शुभमजी भगत यांचे शिष्य तबला साथ ओंकार राजेंद्र गतीर यांनी क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांना साथ दिली . महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका गुरुवर्य सुरमणी सौ . भाग्यश्रीताई देशपांडे (मुंबई ) तसेच त्यांचे वडिल संगीत तज्ञ पांडुरंगजी देशपांडे आंबेजोगाई यांच्या विशेष उपस्थितीत व आशीर्वादाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह .भ. प .शिवाजी महाराज सातपुते यांनी केले .प्रथमता कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने आणि तसेच आपले आराध्य दैवत गणेशाची मुर्ती व राधेश्याम तसेच माता सरस्वतीच्या पुजनाने झाली . प्रथमतः सर्व स्वरांगिनी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी व गुरुवर्य सौ दिपाली राव यांच्या समवेत सरस्वतीचे मातेचे ईशस्तवन म्हटले . त्यानंतर स्वरांगिनी क्लासेसचे विद्यार्थ्यांचे शास्त्रीय संगीत गायन झाले . प्रथम पहिले शास्त्रीय गायन मयुर सचिन शेलवले वय वर्ष ९ या विद्यार्थ्याने बंदिश व गणपती बाप्पा चे गाणे म्हटले. पहिल्या गाण्यापासून शास्त्रीय संगीत गाण्यांची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली . त्यानंतर नम्रता म्हस्कर , वैष्णवी विशे , राजश्री म्हस्कर ,ऋतुजा दुभेले , चारुता दिपक राव , नंदिनी घरत , स्वरूपा आगिवले वय वर्ष ९ , कस्तुरी देसले, जिज्ञासा तारमळे या सर्व स्वरांगिनी क्लासेसच्या विद्यार्थ्यानी बंदिश व अभंग यांचे शास्त्रीय पद्धतीने गायन केले . त्यांच्या गुरुवर्य सौ दिपाली राव यांच्या अथक परिश्रमाने तसेच मुलांनी घेतलेल्या प्रामाणिक मेहनतीने रियाजाने सर्व प्रेक्षकांना त्यांच्या वाणीने मंत्रमुग्ध केले . त्यानंतर गुरुवर्य सौ . दिपाली राव यांचे सुस्वर शास्त्रीय संगीताचे गायन झाले . त्यांनी सर्व प्रेषकांना मंत्रमुग्ध केले .त्यानंतर उपस्थित सर्व गुरुवर्यांचें संचालिका सौ दिपाली राव व आयोजक दिपक महाराज राव यांच्या हस्ते पुजन करून त्यांना सन्मानित करण्यात आले.तद्नंतर महाराष्ट्रा्तील सुप्रसिद्ध गायिका सूरमणी सौ .भाग्यश्रीताई देशपांडे (मुंबई ) सौ दिपाली राव यांच्या गुरूवर्य. यांचे सुस्वर शास्त्रीय संगीताचे गायन झाले . सर्व प्रेषकांना त्यांनी त्यांच्या वाणीने मंत्रमुग्ध केले . कार्यक्रमाला असंख्य वारकरी संप्रदायाचे ह .भ.प .महाराज , वारकरी तसेच गुरुवर्य ,तसेच नावाजलेले गायक , वादक व असंख्य जनसमुदाय तसेच अंजनी कॉम्प्लेक्सचे सदस्य महिला व बालगोपाळांचा सहभाग होता .व नादब्रह्म पखावज क्लासेसचे सर्व शिष्य परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी गुरवर्य सुरमणी सौ . भाग्यश्रीताई देशपांडे यांच्या हस्ते क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले .व भागवताचार्य हे.भ.प.गणेशजी महाराज पुलकुंठवार यांच्या हस्ते उपस्थित सर्व जेष्ठ श्रेष्ठांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर महाप्रसाद झाला . अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button