श्री गणेश विद्या मंदिर शाळेत नवरात्र निमित्त विदयेची देवता सरस्वती देवीची स्थापना , नऊ दिवस आराधना .

दिवा – (सचिन शेलवले ) दि .१७/१०/२३ रोजी दरवर्षी प्रमाणे नेहमी प्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र निमित्त विद्येची देवता सरस्वती देवीची स्थापना श्री गणेश विद्यामंदिर दातिवली दिवा या शाळेत केली आहे . जवळ जवळ दरवर्षी प्रमाणे १० वर्षे या कार्यक्रमाला झाली आहेत . स्टेजवर सुंदर आकर्षक मखर बनवून , सुंदर देखावे बनवुन रंगीत दिव्यांचा झगमगाट तसेच शाळेची ईमारत सुशोभिकरण करून . सर्व ईमारतीवर रंगीत लाईटची सुंदर रोषणाई पहायला मिळते. सकाळी शाळेचे सचिव श्री साईनाथ म्हात्रे यांच्या उपस्थितीत देवीची आरती होते . ते दररोज देवीची पुजा, पाठ नित्य नियमाने नऊ दिवस करतात . जेणे कडुन आमच्या शाळेच्या मुलांच्या शिक्षणात कोणतेही विद्म येऊ नये तसेच शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत राहो अशीच ईच्छा प्रकट करून विद्येची देवता सरस्वतीला हाक घालतात . सकाळी काही मुले तसेच शिक्षक वृंद तसेच संस्थेचे पदाधिकारी देवीची आरती ढोलकी, ताल, खंजिरी ही वादय मुले वाजवून तालासुरात माईकमध्ये म्हणतात . दसऱ्याच्या आदल्या दिवशी सर्व विद्यार्थी शाळेची स्वच्छता करून सुंदर हार, फुले, पताके लावून, देवीचे फोटो लावुन , रांगोळ्या कादुन सर्व वर्ग खोल्या, ऑफिसची व शाळेची सुंदर सजावट करतात . शेवटच्या दिवशी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, माय मदर इंग्लीश स्कुल, तसेच जिजाऊ कला संस्कार केंद्र चे सर्व विद्यार्थी रंगीबेरंगी ड्रेस घालुन पटांगणात देवीच्या समोर गरबा खेळतात . त्यानंतर देवीचा प्रसाद वाटला जातो . सर्व शिक्षिका वृंद व पालक , सर्व सिपाई मावश्या यांचा भोंडल्याचा कार्यकम होतो . अशा प्रकारे नऊ दिवस शालेय वातावरण प्रसन्न राहते . सर्वांना शाळेत यायला उत्साह वाटतो . शेवटी कार्यकमाची सांगता होते .



