जळगावा जिल्हामहाराष्ट्र

खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन संपन्न….


मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी.खडसे

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी शिबिर दत्तकगाव घोडसगाव तालुका-मुक्ताईनगर येथे दिनांक २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
सदर हिवाळी शिबिराचे उद्घाटन श्री. मनोज जनार्धन सांगळकर (माजी सैनिक, घोडसगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. सांगळकर यांनी आपल्या जीवनातील सैन्य दलातील कार्याविषयी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरण देऊन देशप्रेम व समाजसेवा करण्यासाठी नवं युवकांनी सदैव तत्पर राहावे असे आवाहन केले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील हे लाभले होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना हिवाळी शिबिराच्या माध्यमातून व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमातून समाजसेवेविषयी सदैव जागृत राहून देश सेवेसाठी सदैव तत्पर राहावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी घोडसगावचे सरपंच सौ.प्रतिभा प्रदीप कोल्हे , उपसरपंच श्री. नंदकिशोर हिरोळे तसेच पोलीस पाटील श्री. श्रीराम खोटे उपस्थित होते. सदर शिबिराचे संयोजन व नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ताहीरा मीर प्रास्ताविक डॉ. दीपक बावस्कर तर आभार प्रदर्शन डॉ.कृष्णा गायकवाड यांनी केले. सदर शिबिरासाठी महाविद्यालयातील 120 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या शिबिर कालावधीत दत्तक गावात स्वच्छता अभियान, मतदार जनजागृती अभियान, व्यसनमुक्ती अभियान, वित्तीय साक्षरता, आरोग्य विषयक जनजागृती तसेच जलसंधारणाच्या संदर्भात श्रमदानाचे कामकाज करण्यात येणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button