मनुस्मृति दहन दिन व स्त्री मुक्ती दिनानिमित्त गोदावरी नगर मुक्ताईनगर व संबोधी नगर मुक्ताईनगर तर्फे महामानवांना अभिवादन

मुक्ताईनगर प्रतिनिधी
आज मनुस्मृति दहन दिन व स्त्री मुक्ती दिनानिमित्त गोदावरी नगर मुक्ताईनगर व संबोधी नगर मुक्ताईनगर तर्फे महामानवांना अभिवादन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन करून जी स्वतंत्रता समता प्रस्थापित केली त्याचा स्वीकार केला.
गोदावरी नगर येथे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे साळवे सर तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे साहेब कोषाध्यक्ष सपकाळे साहेब तालुका अध्यक्ष महिला पुष्पाताई सपकाळ तालुका सरचिटणीस आरती ताई गवई शहराध्यक्ष ॲड. कुणाल गवई ग्राम शाखा अध्यक्ष गोविंदा तायडे समता सैनिक दलाचे तालुकाप्रमुख प्रमोद पोहेकर कंपनी कमांडर अडांगळे सर खरात सर दीपध्वज कोसोदे सर व गोदावरी नगर मधील बौद्ध उपासक उपासिका यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून बाबासाहेबांनी मनुस्मृती का दहन केली याबाबत मार्गदर्शन साळवे सर यांनी केले व बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन करून समतावादी देशाची निर्मिती देशाची तसेच महिलांना सती ते राष्ट्रपती होण्याचे स्वातंत्र्य दिले शिक्षणाचे स्वातंत्र्य दिले व सशक्त देश घडवण्याचे काम केले



