तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा

मलकापूर प्रतिनिधी (शेख निसार): तहसील कार्यालय मलकापूर तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्राहकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव तथा ग्राहक चळवळीला चालना देण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशात २४ डिसेंबर रोजी ग्राहक दीन साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने तहसील कार्यालय मलकापूर येथे राष्ट्रीय ग्राहक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थानी मलकापूर चे तहसीलदार राहुल तायडे, तर प्रमुख उपस्थिती मध्ये अ.भा.ग्रा. पंचायतचे जिल्हाध्यक्ष नगिनदास बैरागी होते. तसेच पुरवठा निरीक्षक धनश्रीताई हरणे, भूमी अभिलेख उपअधीक्षक विष्णू झनके यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सूरवात संगीत शिक्षक अशोक जंजाळकर यांच्या सह मनीषा खर्चे, दिव्या शंखपाळ यांनी तबला पेटीची साद देत ग्राहाकगीत सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. या नंतर ग्राहकांची भूमिका, ग्राहकांचे हक्क व राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व आदी संदर्भात ग्राहक पंचायतचे जेष्ठ सदस्य कमलजी शर्मा सर यांनी प्रास्ताविकामध्ये माहिती दिली.
प्रमुख उपस्थिती अ.भा. ग्रा. पंचायत चे जिल्हाध्यक्ष नगिनदास बैरागी यांनी ग्राहक चळवळीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे कार्य व त्यातून ग्राहकांना मिळालेले अधिकार संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा तहसीलदार राहुल तायडे यांनी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा करण्यात येतो. ग्राहकांना त्यांचे अधिकार व कर्तव्य याची जाणीव या माध्यमातून केली जाते. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन ग्राहक पंचायत चे जिल्हा सचिव श्रीकांत अंधारे यांनी केले तर आभार तालुका पुरवठा निरीक्षक श्रीमती धनश्रीताई हरणे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी शेतकरी संघटनेचे दामोदर शर्मा, महावितरण चे शेख अलीम, सह विविध शासकीय निमशासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी, ग्राहक चळवळीतील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा. पंचायतचे तालुका संघटक धर्मेशसिंह राजपूत, तालुका संपर्कप्रमुख कैलास गणगे, प्रवीण पाटील, तहसील कर्मचारी गजानन जाधव, गजानन फाळके, वानखेडे यांच्यासह आदींनी अथक परिश्रम घेतले.



