बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रेती तस्करी: शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणारा २०२४ पासूनचा फरार आरोपी जेरबंद!

शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करून २०२४ पासून फरार असलेल्या आरोपीला क्राईम ब्रँच कडून अटक; किनगाव राजा पोलिसांच्या ताब्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ;–शंकर शिवरकर

किनगाव राजा: रेतीच्या गुन्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात बुलढाणा क्राईम ब्रँच (स्थानिक गुन्हे शाखा) पथकाला यश आले आहे. धम्मपाल मच्छिंद्र अंभोरे (वय २४, रा. दिग्रस बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत २०२४ मध्ये रेती चोरी आणि शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात (गुन्हा रजि. नं. ७२/२०२४, भादंवि कलम ३५३, ३७९, ५०६, १४३, १४७, १४९ सहकलम ४८(७)(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६) आरोपी धम्मपाल अंभोरे हा गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार होता.बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, हा आरोपी दिग्रस बुद्रुक परिसरात असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रँचला मिळाली. पोलीस निरीक्षक श्री. आशिष रोही सर यांच्या आदेशानुसार पथकाने तात्काळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला,
मात्र म.पो.दिगंबर कपाटे, L.C.P यांनी आरोपीच्या मागे पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.अटक केल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, L.C.P पथक ,ASI ओम प्रकाश साळवे ,पो. दिगंबर कपाटे, वनिता शिंगणे, यांच्या नेतृत्वात मोहीम यशस्वी राबविल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलाच धडक भरली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button